गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा            गड़चिरोली जिले के सभी नागरिकों को जिला वर्धापन दिवस की हार्दिक शुभकामनाएं!!            गड़चिरोली जिले के सभी नागरिकों को जिला वर्धापन दिवस की हार्दिक शुभकामनाएं!!            पुलिस व लोगों के समन्वय से कम हुआ गड़चिरोली का माओवाद             गडचिरोली के लिए संकटमोचन बना लॉयड्स मेटल्स का हेलिकॉप्टर           









राज्य सहकारी संघाच्या नागपूर विभागीय मतदार संघातून जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधींच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचा विजय
451674-Pramod Pipre 30.jpg
2025-07-30 14:08:29

गडचिरोली : राज्य सहकारी संघाच्या नागपूर विभागीय मतदार संघातून जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधींच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी विजय संपादन केला आहे. मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क व पक्षातील नेतृत्वाच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती. जिल्हा सहकार बोर्डाच्या नागपूर विभागात ते प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपमधील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही चुरशीची निवडणूक त्यांनी यशस्वीपणे लढून विजय संपादन केला. पिपरे यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या विजयासाठी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात सहकार चळवळीत सक्रिय असलेले इंजि.प्रा.सुभाष आकरे, भाजपचे गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते यशवंत मानकर, खुमेंद्र कटरे यांनी परिश्रम घेतले. या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणारे माजी खासदार अशोक नेते, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ.देवराव होळी, आ.डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री योगिता पिपंरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा सहकारी बोर्डचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.













Cricket
राशिफल
    वीडियो
No Video Found ...
Web Counter
Back to Top