पत्नीची हत्या करुण पतीचे आत्मसमर्पण
2022-04-24 16:43:02
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पतिनेच पत्नीच्या डोक्यावर लोखंडी राडने मारून हत्या केल्याची घटना रविवार 24 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
विद्या देविदास चौथाले (वय 24) रा आष्टी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून देविदास पुंजाराम चौथाले (वय 30) असे आरोपी पतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आष्टी येथील देविदास चौथाले यांचा दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला होता. दोघांचाही सुखी संसार चालत असताना पती देविदासने पत्नी विद्याच्या डोक्यावर लोखंडी राडने मारल्याने विद्याचा मृत्यु झाला. घरगुती भांडणावरून ही हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. आरोपी देवीदासने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर लोखंडी राडने मारून हत्या केली.असल्याची कबुली स्वतः देविदासने आष्टी पोलीस ठाण्यात हजर होऊन दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले करीत आहेत. या घटनेने आष्टी शहरात एकच खळबळ उडाली झाली आहे.