गड़चिरोली प्रेस क्लब के अध्यक्ष बने अविनाश भांडेकर             शक्ति प्रदर्शन के साथ भाजपा के डा. होली ने दोबारा दाखिल किया नामांकन             वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ पर धन उगाही का आरोप            सभी जिला वासियों को विश्व आदिवासी दिवस पर हार्दिक शुभकमानाएं!!!            जिले में दूसरा नवोदय विद्यालय शुरु करें, सांसद नेते की केंद्र सरकार से मांग           









अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु
472415-IMG-20220424-WA0012.jpg
2022-04-24 20:39:42

गड़चिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी-चामोर्शी मार्गावरील पेट्रोलपंप जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना रविवार 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. विनोद मंगर (34) रा. मुरखळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार विनोद मंगर हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच 33 ई 653 ने कामकाजाकरिता तारसा या गावी गेले होते. कामकाज आटोपून सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान आपल्या स्वगावी मुरखळा येथे परत येत असताना चामोर्शी मार्गावरील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत विनोदच्या डोक्याला मार लागल्याने विनोदचा घटनास्थळीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेहाला पोस्टमार्टम करिता आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास आष्टी पोलिस करीत आहेत.













Cricket
राशिफल
    वीडियो
No Video Found ...
Web Counter
Back to Top