दहाविच्या परीक्षेत उत्तूंग भरारी घेत 96.80 टक्के गुण प्राप्त करून सुश्मित कौर चरणजीतसिंह सलुजा जिल्ह्यात दुस-या स्थानी आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा            लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड की जीडीपीएल प्रतियोगिता को हार्दिक शुभकामनायें             गड़चिरोली प्रेस क्लब के अध्यक्ष बने अविनाश भांडेकर             शक्ति प्रदर्शन के साथ भाजपा के डा. होली ने दोबारा दाखिल किया नामांकन             वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ पर धन उगाही का आरोप           









दुचाकीची चितळास धडक, दुचाकीस्वार व चितळ ठार , युवती जखमी
468506-1.jpg
2022-04-25 18:02:48

चामोर्शी :- पोलीस मदत केंद्र पोटेगाव हद्दीतील कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात दुचाकीची चितळाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व चितळ ठार झाले आहेत तर दुचाकीवरील युवती जखमी झाली आहे. सुनील मनकु कडयामी (वय ३३) रा भेंडीकन्हार असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, काजल भीमराव पोटावी ( २२) रा मालेरमाल असे जखमी युवतीचे नाव अहे. सदर घटना २४ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास भेंडीकन्हार दुधवाई मार्गावर घडली .
प्राप्त माहितीनुसार मृतक सुनील मनकु कडयामी यांची भाची काजल भीमराव पोटावी ही कार्यक्रमानिमित्य भेंडीकन्हार येथे मामाकडे आली होती. कार्यक्रम पार पडल्यानंतर मृतक सुनील कडयामी हे भाचीला स्वगावी पोहचविण्याकरिता गिलगाव मार्गे एम एच ३३ , वाय ९२५८ क्रमांकाच्या पलसर गाडीने निघाले , वनपरिक्षेत्र कुनघाडा रै, गिलगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १०९ मधील दुधवाई जंगल परिसरात गिलगाव-पोटेगाव मुख्य मार्गावर वन्य प्राण्यातील चितळ आडवा आल्याने दुचाकीची चितळाला जोरधार धडक बसली. धडकेत चितळ जागीच ठार झाला असून, दुचाकीस्वार सुनील कडयामी यांचा गडचिरोली सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला तर जखमी युवती काजल पोटावी ही गडचिरोली सामान्य रुग्णालयात भरती आहे .
मृत चितळाचे कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात दहन
दुचाकीच्या धडकेत वन्य प्राण्यातील चितळ ठार झाल्याचे कळताच वनपरिक्षेत्रधिकारी महेशकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एस एम मडावी यांच्या चमूने घटनास्थळ गाठून , मृत चितळास वनविभागाच्या ताब्यात घेतले , गिलगाव येथील पशुधन विकास अधिकारी गोंगल व सहाय्यक चौधरी यांनी चितळाचे शव विच्छेदन केले असता दुचाकीची जोराची धडक बसल्यामुळे श्वास रोखून चितळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले, विशेष म्हणजे चितळ गरोदर अवस्थेत होते , सर्व चौकशीअंती मृत चितळाचे कुनघाडा रै वनपरिक्षेत्रात दहन करण्यात आले . यावेळी वनरक्षक देवेंद्र वासेकर, वनरक्षक कौशल्या मडावी,वनरक्षक आय आर भेंडेकर व इतर वनकर्मचारी हजर होते पुढील तपास सुरू आहे.
अन्न व पाण्याच्या शोधात वन्यप्राणी रात्रीच्या वेळी बाहेर पडत असतात मुख्यतः रस्त्यावर येत असतात जंगली भागात रस्त्याने वाहन चालवताना दक्षता घ्यावी , समोरचा धोका टाळण्यासाठी वाहने हळू चालवावी व वन्य प्राण्यांचे संरक्षण करावे असे आव्हान वनपरिक्षेत्रधिकारी महेशकुमार शिंदे व क्षेत्र सहाय्यक एस एम मडावी यांनी केले













Cricket
राशिफल
    वीडियो
No Video Found ...
Web Counter
Back to Top