मोहफुलांपासून दारूनिर्मितीचा मंत्रिमंडळाचा निर्णय
2022-04-20 20:29:44
गडचिरोली : मोहफुलांपासून दारू निर्मिती करून विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाने आज 20 एप्रिल रोजी घेतला. या निर्णयामुळे आदिवासींना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावणार असल्याने जिल्हाभरातील मोहफुले संकलन करणा-या आदिवासींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मोहफुलांपासून दारू निर्मिती करून विदेशी दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी जिल्ह्यातील दारू सुरू होणार असे नाही.