18 लाखांचे बक्षिस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यास अटक
2022-04-21 19:31:49
नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलिस दलास मोठे यश
अटकेत दोन एसीएम व दोन सदस्यांचा समावेश
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाया पोमके धोडराज हद्दीत 21 एप्रिल 2022 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे.
नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत अशी गोपनिय माहिती पोलीस दलास मिळाल्याने पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियाना दरम्यान 4 जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये 1) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे वय 30 वर्ष रा. नेलगंुडा ता. भामरागड 2) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे वय-34 वर्ष रा. कनेली ता. धानोरा 3) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड¬ामी वय- 24 वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड 4) अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.
जहाल नक्षली बापु वड्डे हा कंपनी क्र. 10 मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा 7 खुन, 3 चकमक, 1 जाळपोळ, 2 दरोडा, अशा एकुण 13 गुन्हयामध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा एकुण 3 चकमकीच्या गुन्हयामध्ये समावेश आहे. सुमन कुड¬ामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचा 3 खुन व 8 चकमक अशा एकुण 11 गुन्हयामध्ये समावेश आहे.
13 एप्रिल 2022 रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये नामे अशोक ऊर्फ नविन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे व अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा सक्रीय सहभाग होता.
नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने 1) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर 8 लक्ष रूपये. 2) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे याचेवर 6 लक्ष रूपये. 3) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड¬ामी हीचेवर 2 लक्ष रूपये व अजित ऊर्फ भरत याचेवर 2 लक्ष रूपये असे एकुण 18 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.