रविवारला नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ स्तरीय अधिवेशन
2022-04-23 14:51:10
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य पत्रकार सघ मुंबईच्या वतीने विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशनाचे आयोजन रविवार 24 एप्रिल रोजी नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी 9 वाजता सुरू होणार असून दोन सत्रात चालणार आहे. सकाळी 9 वाजता अधिवेशन नाव नोंदणी करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रथम सत्र चालणार असून या सत्रात स्मरणिका प्रकाशन व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, स्वागताध्यक्ष उर्जा मंत्री नितीन राऊत, उद्घाटक म्हण्ून गडचिरोली-िचमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कॅबिनेट मंत्री शोभाताई फडणवीस, माजी कॅबीनेट मंत्री रमेशचंद्र बंग, आमदार तथा काँग्रेस कमेटीचे नागपूर शहरअध्यक्ष विकास ठाकरे, आमदार राजुभाऊ पारवे, चंद्रपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे दुसरे सत्र दुपारी 2 वाजता सुरू होणार असून ‘पत्रकार आणि पत्रकारिता’ या विषयावर चर्चासत्र चालणार आहे. चर्चासत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक उपस्थित राहणार असून उद्घघाटक म्हणून नागपूर येथील माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल तर प्रमुख अतिथि व मार्गदर्शक म्हणून दैनिक महाराष्ट टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत, दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे, दैनिक राष्ट्रप्रकाशचे संपादक सुदर्शन चक्रधर उपस्थित राहणार आहेत.
रविवार 24 एप्रिल रोजी होणा-या विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशनास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, पूर्व विभागाचे विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रूपराज वाकोडे व विदर्भ स्तरीय द्वितीय अधिवेशन समितीच्या आयोजकांनी केले आहे.